लातूर जिल्हा सहकारी बँक लिमीटेड, लातूर

गोपनीयता धोरण

परिचय

ही गोपनीयता बांधिलकी वैयक्तिक माहिती आणि संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहितीला लागू असून त्यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, लातूर बँकेच्या सेवा वापरणारे (“ग्राहक” किंवा “तुम्ही”) ग्राहक, संभाव्य ग्राहक आणि इतर सेवा वापरकर्ते यांच्यासंदर्भातील कुठलीही गोपनीय स्वरूपाची माहिती (ग्राहक माहिती) यासाठी बँकेला आणि बँक ज्या समूह कंपनींशी (सरसकटपणे “लातूर डीसीसी बँक”, “आम्ही”, किंवा “आपण”) जोडलेली आहे त्यांना लागू आहे.
या वेबसाईटचा, मोबाईल अॅप्लिकेशनचा, कस्टम एक्स्टेंशनचा वापर करत असताना किंवा उत्पादने अथवा सेवा यांचा बँकेच्या कुठल्याही शाखेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन वापर करत असताना, विक्रीच्या इतर ठिकाणी, थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म, किंवा इलेक्ट्रोनिक अथवा इतर माध्यमातून किंवा इतर माध्यम/प्लॅटफॉर्म/वेळोवेळी लातूर डीसीसी बँकेने देऊ केलेल्या (एकत्रितरीत्या “सेवा”तून) लातूर डीसीसी बँक ग्राहक माहिती गोळा करू शकते, स्वीकारू शकते, मालकीची करू शकते, साठवून ठेवू शकते, वापरू शकते, समाचार घेऊ शकते, हाताळू शकते, हस्तांतरित करू शकते, रोखून ठेवू शकते किंवा अन्य मार्गाने प्रक्रिया करू शकते. आमच्या सेवेचा लाभ घेऊन किंवा त्यापर्यंत पोहोचून तुम्ही निश्चित करत आहात की, तुम्ही ही गोपनीयता बांधिलकी वाचली असून, ती तुम्हाला मान्य आहे. लातूर डीसीसी बँकेच्या या गोपनीयता बांधिलकीमध्ये वर्णन केल्यानुसार तुमच्या संदर्भातील ग्राहक माहिती गोळा करणे, स्वीकारणे, ताब्यात ठेवणे, साठवणे, वापरणे, परामर्श घेणे, हाताळणे, प्रक्रिया करणे, हस्तांतरित करणे किंवा रोखून ठेवणे याला तुमची मान्यता आहे.
आपल्या ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी लातूर डीसीसी बँकेची कटाक्षाने बांधिलकी असून ग्राहक माहितीची गोपनीयता आणि प्रेषण यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य आणि वाजवी पाऊले बँकेने उचलली आहेत.

ग्राहक माहिती

ग्राहक माहितीमध्ये आम्ही खालील श्रेणींतील वैयक्तिक डेटा/संवेदनशील वैयक्तिक डेटा संदर्भात कुठल्याही मर्यादेशिवाय माहिती गोळा करणे, प्राप्त करणे, ताब्यात ठेवणे, साठवणे, वापरणे, परामर्श घेणे, हाताळणे, प्रक्रिया करणे, हस्तांतरित करणे किंवा कायद्यानुसार लागू होणाऱ्या इतर प्रक्रिया करू शकतो.
  1. तुमच्यासंदर्भातील डेटा – यामध्ये कुठल्याही मर्यादेशिवाय या बाबी अंतर्भूत असू शकतात – तुमचे नाव, युजर आयडी, सही, ई-मेल अॅड्रेस, फोन क्रमांक, पत्ते, केवायसी/परिचय कागदपत्रे (उदा. आधार आणि पॅन), बायोमेट्रिक डेटा, आमच्याशी साधलेला संवाद, डिव्हाईस आणि लोकेशन डेटा, तुम्ही आमच्या सेवांचा वापर कसा करता याबाबत माहिती, इत्यादी.
  2. आर्थिक डेटा – यामध्ये कुठल्याही मर्यादेशिवाय या बाबी अंतर्भूत असू शकतात – तुमच्या बँक खात्यासंबंधी माहिती, आर्थिक माहिती, देय (पेमेंट) ओळखपत्रे (क्रेडेन्शियल), हस्तांतरण डेटा, कर्ज संदर्भात रक्कम, थकबाकी, भरणा, क्रेडिट इतिहास आणि उत्पन्नासंबंधी माहिती.
  3. विपणन (मार्केटिंग) आणि संवाद (कम्युनिकेशन) डेटा – यामध्ये कुठल्याही मर्यादेशिवाय या बाबी अंतर्भूत असू शकतात – आमच्याकडून आणि आम्हाला सेवा देणाऱ्यांकडून मार्केटिंग संदर्भातील माहिती मिळवण्यासंबंधी आणि कम्युनिकेशनसंबंधी आपला कल (प्रेफरन्स). आपण आम्हाला देत असलेली सर्व ग्राहक माहिती अचूक, अद्ययावत आणि सत्य आहे याची तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे. तुम्ही आम्हाला पुरवलेल्या ग्राहक माहितीमध्ये काही त्रुटी, तफावत किंवा चूक आढळली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. कायद्यानुसार लागू असलेल्या केवायसीच्या माध्यमातून प्राप्त ज्या ग्राहक माहितीची पडताळणी झाली आहे, आणि ज्याला कागदपत्रांचा पुरावा उपलब्ध आहे, ती याला अपवाद आहे. तुम्ही सेवेचा वापर करता तेव्हा कायद्यानुसार आवश्यक अशा सर्व ग्राहक माहितीपर्यंत पोहोचून चुकीची किंवा अपुरी माहिती सुधारण्याची सोय तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.

ग्राहक माहिती गोळा करणे

आमची सेवा प्रदान करणे, आमच्या कराराअन्वये असलेल्या आणि कायद्यानुसार लागू असणाऱ्या उत्तरदायित्वाची पूर्तता करणे यासाठी ग्राहक माहिती गोळा करणे आम्हाला आवश्यक आहे. आमच्याकडून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ही ग्राहक माहिती पुरवण्याची आपली इच्छा नसेल, तर तुमच्याबरोबर जी व्यवस्था आम्ही केली आहे किंवा जी करू पाहत आहोत (उदा. सेवेची वैशिष्ट्ये आपल्यापर्यंत पोहोचवणे) त्या संदर्भातील आमची क्षमता त्यामुळे नष्ट/कमी होईल. परिणामतः, सेवेचा (किंवा त्यातील काही भागाचा) लाभ तुम्हाला घेऊ देण्यावर आम्हाला बंधन घालावे लागेल किंवा ती रद्द करावा लागेल.
तुमच्याकडून आणि तुमच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आम्ही विविध पद्धती वापरतो. यामध्ये कुठल्याही मर्यादेशिवाय या बाबींचा अंतर्भाव होतो.
  1. थेट संपर्क – तुम्ही आमच्या सेवा वापरता किंवा आमच्याशी संपर्क साधता तेव्हा ज्याला मान्यता देता अशी ग्राहक माहिती. यामध्ये कुठल्याही मर्यादेशिवाय या बाबी अंतर्भूत आहेत. तुम्ही जेव्हा
    1. आमच्याकडे खाते उघडता.
    2. सेवा वापरता किंवा सेवा संदर्भात इतर कुठली कृती करता.
    3. मार्केटिंग कम्युनिकेशन स्वीकारण्यास मान्यता देता. or
    4. सेवासंदर्भात काही अडचण असल्याचा अहवाल (रिपोर्ट) देता, आम्हाला आपला अभिप्राय देता, किंवा आमच्याशी संपर्क साधता.
  2. स्वयंचलित तंत्रज्ञान किंवा परस्परक्रिया (ऑटोमेटेड टेक्नोलॉजी किंवा इंटरअॅक्शन) – तुम्ही जेव्हा सेवा वापरता तेव्हा तुम्ही वापरत असलेले साधन, ब्राउझिंग कृती आणि शैली यांसंदर्भात आम्ही स्वयंचलितरीत्या डेटा गोळा करू शकतो. कुकीज, वेब बेकन्स, पिक्सेल टॅग्ज, सर्व्हर लॉग्ज, आणि इतर समान तंत्रज्ञानाचा वापर आम्ही त्याकरता करतो. आमच्या कुकीज वापरणाऱ्या इतर वेबसाईटना तुम्ही भेट दिल्याससुद्धा आम्हाला तुमच्याबाबत असा डेटा प्राप्त होऊ शकतो.
  3. थर्ड पार्टी किंवा सार्वजनिकरीत्या उपलब्ध स्रोत – सार्वजनिकरीत्या उपलब्ध स्रोत किंवा विविध थर्ड पार्टी – जसे की आमचे सर्व्हिस प्रोव्हायडर, क्रेडीट ब्युरोज, भागीदार, युती भागीदार, समूह कंपनीज, एजंट्स, संबद्ध (अॅफिलिएट्स) आणि सरकारी पोर्टल्स – यांच्याकडून आम्हाला ग्राहक माहिती प्राप्त होऊ शकते.

कुकीज

लातूर डीसीसी बँक वेबसाईट ही गुगल अॅनेलिटिक्सचा वापर करते. ही वेब अॅनेलिटिक्स सेवा गुगल इंकॉर्पोरेशनकडून पुरवली जाते. गुगल अॅनेलिटिक्सकडून वापरल्या जाणाऱ्या कुकीज या टेक्स्ट फाईल असून त्यात कमी प्रमाणात माहिती असते (ज्यामध्ये वैयक्तिक संवेदनशील माहितीचा समावेश नसतो). तुम्ही जेव्हा एखाद्या वेबसाईटला भेट देता तेव्हा तुम्हाला ब्राउझिंगचा वैयक्तिक अनुभव देता यावा याकरता त्या तुमच्या डिव्हाईसवर डाऊनलोड होतात. कुकीज इतर अनेक कामे करतात, त्या तुम्हाला विविध पानांवर (पेजेस) नेव्हिगेट करू देतात, तुमचा प्राधान्यक्रम लक्षात ठेवू देतात, सहसा तुमचा ब्राउझिंग अनुभव अधिक चांगला करतात. तुम्ही एखादी वेबसाईट कशी वापरता (उदा. वरचेवर कुठल्या पेजेसना व्हिजिट करता) या संदर्भातील माहिती अॅनेलिटिक्स या कुकीज गोळा करतात.
आमच्या साईटला भेट देणाऱ्या व्हिजिटर्सबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याकरता मदत होण्यासाठी आम्ही कदाचित थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधू शकतो. आमच्या सेवा देता येण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी हे सर्व्हिस प्रोव्हायडर आमच्या वतीने गोळा केलेली माहिती वापरू शकतात.
त्याचप्रमाणे, थर्ड पार्टीने वेबसाईटच्या विशिष्ट पेजेसवर नियोजित केलेल्या कुकीजशी किंवा तत्सम डिव्हाईसशी आपला संपर्क येऊ शकतो. थर्ड पार्टीकडून वापरल्या जाणाऱ्या कुकीजवर आमचे कुठलेही नियंत्रण नाही. थर्ड पार्टी कुकीजकडून गोळा करण्यात येणारी सर्व माहिती ही सरसकट आणि त्यामुळे अनामिक असते.
तुमच्या वेब ब्राउझरचे सेटिंग बदलून तुम्ही या कुकीज डिलीट करायला किंवा डिसएबल करायला मोकळे आहात. थर्ड पार्टीकडून ग्राहकांच्या डिव्हाईसमध्ये ठेवण्यात आलेल्या कुकीजकरता आणि त्याद्वारे गोळा करण्यात येणाऱ्या माहितीकरता लातूर डीसीसी बँक जबाबदार नाही.

ग्राहक माहितीचा वापर

तुमच्या संदर्भातील माहितीचा वापर करताना लागू होणारे कायदे आणि करारातील उत्तरदायित्वातील अनुरोधानुसार मान्य असणारी माहितीच तेवढी आम्ही वापरतो. सर्वसाधारणपणे आम्ही सेवांचा लाभ देण्याकरता आणि कायदेशीर/कंत्राटी उत्तरदायित्त्व पूर्ती करण्याकरता तुमच्या ग्राहक माहितीचा वापर करू. खालील कारणांकरता आम्ही तुमच्या ग्राहक माहितीचा वापर कुठल्याही मर्यादेशिवाय करू.
  1. तुमची नोंद ग्राहक म्हणून करत आमच्याकडे तुमचे खाते (खाती) निर्माण करणे आणि ते/ती चालवणे यासाठी तुमचा परिचय पडताळणी करण्यासाठी;
  2. तुम्हाला सेवा देऊ करणे;
  3. आमच्या सेवेच्या माध्यमातून केलेल्या देयांवर प्रक्रिया करण्यासाठी;
  4. कायदेशीर बंधनांचे पालन करण्यासाठी;
  5. आमचा व्यवसाय आणि सेवा राबवणे आणि त्यांचे संरक्षण करणे यासाठी. यामध्ये ट्रबलशुटिंग, डेटा अॅनेलिसिस, सिस्टीम टेस्टिंग आणि अंतर्गत कार्यवाही (ऑपरेशन्स) करणे यांचा समावेश होतो;
  6. जोखीम नियंत्रण करणे, घोटाळे शोधणे (फ्रॉड), आणि थोपवणे;
  7. ज्या व्यवस्था (अरेंजमेंट) आम्ही तुमच्याशी करणार आहोत किंवा केल्या आहेत त्यातून आमच्यावर आलेले उत्तरदायित्त्व पूर्ण करण्यासाठी;
  8. न्यायालयीन आदेशांना उत्तर देणे, आमचे कायदेशीर हक्क प्रस्थापित करणे किंवा वापरणे किंवा कायदेशीर दाव्याविरुद्ध स्व-संरक्षण करणे यासाठी;
  9. तुम्ही सेवेसंदर्भात केलेल्या विनंतींना परिणामकारकरीत्या प्रतिसाद देण्याकरता ग्राहकसेवा सुधारण्यासाठी आणि आवश्यकतांना आधार देण्यासाठी;
  10. तुमच्याकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायाच्या आणि माहितीच्या आधारे आमच्या सेवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी;
  11. तुमच्यासोबत असलेले आमचे नातेसंबंध टिकवताना तुम्हाला नोटीफिकेशन पाठवणे, आमच्या सेवेत बदल झाला असल्यास त्या संदर्भात सूचना करणे, तुम्ही आमची जी सेवा वापरत आहात त्या संदर्भात माहिती आणि अद्ययावत झालेल्या बाबी कळवणे, आमच्याशी किंवा आमच्या सेवेशी संबंधित अद्ययावत माहिती कळवणे, क्वचित कधी येणारी कंपनीसंबंधित बातमी कळवणे;
  12. कुठल्या ट्रेंड्स सुरू आहेत यावर लक्ष ठेवणे आणि तुमचा अनुभव अधिक वैयक्तिक करणे;
  13. आमच्या सेवांची तुमच्यापर्यंत जाहिरात करणे आणि मार्केटिंग करणे;
  14. आमचा व्यवसाय अधिक सुधारणे.
  15. प्रशिक्षण आणि एआय प्रशिक्षण देणे.

ग्राहक माहिती उघड करणे

जोवर खालीलप्रमाणे कृती करणे आवश्यक ठरत नाही तोवर लातूर डीसीसी ग्राहक माहिती कुठल्याही व्यक्तीला उघड करत नाही.
  1. आमच्या सेवा देऊ करणे आणि पुरवणे, वरील सेक्शन ५मध्ये उल्लेख केलेल्या उद्देशांसह;
  2. कायदेशीररीत्या आवश्यक असणाऱ्या बाबींबरहुकुम किंवा कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे;
  3. लातूर डीसीसी बँक, तिचे सहयोगी किंवा ग्रुप कंपनी यांचे अधिकार, स्वारस्य किंवा मालमत्ता यांचे रक्षण किंवा संरक्षण करणे;
  4. सेवेच्या अटी शर्थी यांची अंमलबजावणी करणे; किंवा
  5. लातूर डीसीसी बँक, तिचे सहयोगी किंवा ग्रुप कंपनी, सदस्य, घटना किंवा इतर व्यक्ती यांचे स्वारस्य रक्षण करणे.
कृपया नोंद घ्यावी – तुम्हाला सेवा पुरवताना आम्हाला कदाचित लातूर डीसीसी बँकेबाबतची किंवा तिच्या मालकीची माहिती कधी कधी सांगावी लागेल. अशी माहिती तुम्ही गोपनीय ठेवाल आणि थर्ड पार्टीला सांगणार नाही, अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. ही माहिती गोपनीय ठेवण्यात आपल्याला अपयश आले, तर लातूर डीसीसी बँकेचे नुकसान होऊ शकते. असे नुकसान झाल्यास लातूर डीसीसी बँकेकडून तुम्हाला देण्यात येणाऱ्या सेवा खंडित करण्याचा, तसेच इतर हक्क बजावण्याचा आणि त्यावरचे उपाय अमलात आणण्याचा अधिकार लातूर डीसीसी बँक राखून ठेवते.
ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता येण्यासाठी लातूर डीसीसी बँक ग्राहक माहितीचे संकलन आणि वापर हे जाणून-घेणे-आवश्यक या तत्त्वावर मर्यादित ठेवेल. योग्य गोपनीय उत्तरदायित्त्वाला अनुसरून आणि कंत्राटी शर्ती, लागू होणारे कायदे आणि आमच्या सूचनांनुसार लातूर डीसीसी बँकेकडून ग्राहक माहिती ही थर्ड पार्टीला (यात आमचे सहयोगी, ग्रुप कंपनी, उत्तराधिकारी, सेवा देणारे, व्हेंडर आणि भागीदार यांचा समावेश होतो) देऊ शकते किंवा त्यांच्याकडे साठवून ठेवू शकते. आकार आणि गुंतागुंत लक्षात घेता या गोपनीय बांधिलकीमध्ये प्रत्येक थर्ड पार्टीचे नाव लिहिणे कठीण आहे. अशा थर्ड पार्टीमध्ये खालील समावेश होतो, मात्र तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही.
  1. इन्कम टॅक्स विभागासहित इतर कुठलाही महसूल किंवा कर विभाग लागू होणाऱ्या नियमांतर्गत बांधील असल्यास;
  2. भारताबाहेरील नियामक आणि अधिकारी आणि त्यांची कर्तव्ये (जसे की गुन्हा प्रतिबंध);
  3. आम्ही आमचे अधिकार आणि/किंवा उत्तरदायित्त्व ज्यांच्याकडे हस्तांतरित करू असे कुणीही;
  4. इतर कुठलीही व्यक्ती किंवा संस्था त्यांच्या पुनर्रचनेनंतर, विक्री किंवा प्राप्तीनंतर, जोवर ती व्यक्ती तुमची माहिती ज्या कारणास्तव आम्हाला दिली होती आणि आम्ही ती वापरत होतो त्याच कारणास्तव वापरत असेल तोवर;
  5. क्रेडिट संदर्भ, परिचय आणि पत्ता पडताळणी संस्था या कदाचित तुमची माहिती नोंदवून तिचा वापर करू शकतील, ती इतर कर्जदारांशी किंवा आर्थिक सेवा संस्थांशी किंवा विमा कंपन्यांशी वाटून घेऊ शकतील. त्या थर्ड पार्टीकडून तुमचं क्रेडिट कर्जशोध घेण्यासाठी कितपत योग्य आहे याचं मूल्यमापन करण्याकरता तुमची माहिती वापरली जाऊ शकते.
  6. फ्रॉड थोपवणाऱ्या एजन्सी आणि कायदा राबवणाऱ्या एजन्सी या फ्रॉड आणि मनी लॉन्डरिंग थोपवण्यासाठी तसेच तुम्ही जर खोटी किंवा चुकीची माहिती दिली असेल आणि फ्रॉड उघडकीला आले असेल तर तुमच्या परिचयाची पडताळणी पाहण्यासाठी करू शकतील. आम्ही, फ्रॉड थोपवणाऱ्या एजन्सी आणि कायदा राबवणाऱ्या एजन्सी पुढील गोष्टींसाठी तुमची माहिती प्राप्त करू शकतो किंवा वापरू शकतो; जसे की
    1. क्रेडिट आणि क्रेडिट संबंधी किंवा इतर सोयीसंदर्भात अर्जावरील माहिती तपासणे;
    2. क्रेडिट आणि क्रेडिट संबंधित खाते अथवा सोयी व्यवस्थापन;
    3. कर्ज वसुली;
    4. सर्व प्रकारचे विमा संदर्भात ठराव आणि दावे तपासणे.
  7. ज्या इतर सेवा किंवा इतर उत्पादने अथवा सेवा देणारे यांना तुम्ही कदाचित होकार दिला असेल किंवा ज्यांची शिफारस झाली असेल;
  8. बँकेला कार्यवाही पाठिंबा देण्यासाठी वेळोवेळी जे सेवादाते नेमले असतील;
  9. ग्राहक म्हणून तुम्हाला मेल पाठवण्याच्या उद्देशाने नेमलेले कुरियर किंवा टपाल सेवा;
  10. जिथे अनुमती असेल तिथे आमच्या मार्केटिंग कॅम्पेनसाठी सोशल मीडिया वेबसाईट;
  11. डेटा अॅनेलिटिक्स देणारे;
  12. सल्लागार आणि वकील.
पुढील माहितीसाठी कृपया आमच्या उत्पादनासंबंधी विशिष्ट अटी आणि शर्थी तसेच अॅप्लिकेशन फॉर्म पाहा.
केवळ उपर निर्देशित उद्देश किंवा कंत्राटी उत्तरदायित्त्व यासाठीच या थर्ड पार्टी ग्राहक माहितीचा वापर करतील.
लातूर डीसीसी बँक कदाचित ग्राहक माहितीचा सर्व किंवा काही भाग कायद्यानुसार आवश्यक असल्यास आपल्या सहयोगी किंवा ग्रुप कंपनींना देऊ शकेल, देवाणघेवाण, हस्तांतरण करू शकेल, लातूर डीसीसी बँकेने ग्राहक माहितीचा असा वापर केला म्हणून ग्राहक लातूर डीसीसी बँकेला जबाबदार धरू शकणार नाही.

ग्राहक माहिती – साठवणूक आणि हस्तांतरण

ग्राहक माहितीची साठवणूक आणि हस्तांतरण या संदर्भात लातूर डीसीसी बँक ही लागू होणारे कायदे/अंतर्गत धोरण यांचे अनुसरण करते. सेवेचा लाभ घेताना तुम्ही जी ग्राहक माहिती आम्हाला देता ती तुम्ही वास्तव्य करत असलेल्या देशाव्यतिरिक्त इतर देशांत हस्तांतरित करून साठवून ठेवली जाऊ शकते. ज्या देशात तुम्ही किंवा आमचे व्हेंडर, भागीदार, किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर वास्तव्य करत आहात त्या देशाव्यतिरिक्त इतर कुठल्या देशांत आमचे सर्व्हर्स अधूनमधून असतील तर असे होऊ शकते. आम्ही हस्तांतरित केलेली ग्राहक माहिती ही योग्य गोपनीयता बांधिलकीच्या मर्यादेत असेल आणि तिथवर सहज पोहोचता येईल, तसेच ग्राहक माहिती प्रक्रिया ही कंत्राटी शर्ती लागू होणारे कायदे आणि आमच्या सूचना यांना अनुसरून असेल याची आम्ही खात्री देतो.

ग्राहक माहिती राखून ठेवणे

तुम्हाला सेवा देताना लागू होणारे कायदे आणि तुमचे खाते व्यवस्थापन आणि त्या दरम्यान उद्भवणारे कुठलेही मुद्दे या संदर्भातील आमची अंतर्गत धोरणे यानुसार किंवा कुठल्याही कायदेशीर अथवा नियामक आवश्यकतेच्या अनुपालानासाठी, किंवा संस्थेसाठी, अंमलबजावणीसाठी किंवा कायदेशीर दाव्यांविरुद्ध लढण्यासाठी तुमची ग्राहक माहिती जितका काळ राखून ठेवणे आवश्यक असेल, तितकी ती लातूर डीसीसी बँकेकडून राखून ठेवली जाईल.
आमच्या व्यवसायासाठी अथवा त्यासंदर्भातील कामासाठी, चौकशी किंवा तक्रारींना उत्तरे देण्यासाठी – केवळ यापुरती मर्यादित नाही – फ्रॉडचा अथवा आर्थिक गुन्ह्याचा सामना करण्यासाठी किंवा कंत्राटी उत्तरदायित्त्व संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी लातूर डीसीसी बँकेला आवश्यकता वाटल्यास तुमची ग्राहक माहिती राखून ठेवली जाईल.
आम्हाला जर ग्राहक माहिती राखून ठेवणे गरजेचे नसेल, तर आमच्या अंतर्गत धोरणानुसार आम्ही अशी ग्राहक माहिती नष्ट किंवा डिलीट करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतो.

ग्राहक माहिती सुरक्षा

अनधिकृत वापरकर्त्यापासून ग्राहक माहिती सुरक्षित राखण्यासाठी लागू होणाऱ्या कायद्यान्वये सुचवलेली प्रमाणके वापरून योग्य पद्धती वापरण्याकरता लातूर डीसीसी बँक प्रयत्नशील आहे. लातूर डीसीसी बँक ही ग्राहक माहिती हस्तांतरणासाठी योग्य प्रकारे सुरक्षित एन्क्रिप्शन वापरते.
ग्राहक माहिती सुरक्षित राहील याची खात्री करून घेण्यासाठी ग्राहकाने लातूर डीसीसी बँकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. ग्राहकांनी आपले पासवर्ड्स योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक निवडावे जेणेकरून कुणा तिसऱ्या व्यक्तीने अनधिकृत प्रवेश करू नये. पासवर्ड गुंतागुंतीचा करत इतरांना तो ओळखणे कठीण जावे यासाठी ग्राहकाने त्यामध्ये विविध मुळाक्षरे, अंक आणि !, @, #, $, इत्यादीसारखी विशेष चिन्हे जरूर वापरावीत. ग्राहकाने आपला पासवर्ड कुणाला सांगू नये. तो कुठेही लिहून ठेवू नये, त्याची इतर कुठल्याही प्रकारे नोंद नसावी जेणेकरून कुणा तिसऱ्या व्यक्तीला तो प्राप्त होईल.

या गोपनीयता बांधिलकीसंदर्भात अद्ययावत माहिती

क्वचितप्रसंगी आम्ही ही गोपनीयता बांधिलकी अद्ययावत (अपडेट) करू. अशा अपडेटनंतर आमची सेवा वापरताना तुम्ही या गोपनीयता बांधिलकीसंदर्भात अपडेटला मान्यता देता.
आमच्या गोपनीयता उपायांसंदर्भात नवीनतम माहिती मिळवण्यासाठी तुम्ही गोपनीयता बांधिलकी अधूनमधून पाहत जावी असे आम्ही सुचवू.

आमच्याशी संपर्क साधणे आणि तक्रार अधिकारी

ही गोपनीयता बांधिलकी, तुमची ग्राहक माहिती आम्ही कशी हाताळतो, त्यावर कशी प्रक्रिया करतो, या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असू शकतात, हे आम्ही जाणतो. तुमच्या शंका, प्रश्न, तक्रारी, अभिप्राय आणि शेरे यासाठी इथे संपर्क साधा.
नाव – श्री. वैभव कुलकर्णी
पद – आयटी मॅनेजर
ईमेल: infotech@laturdccb.com