लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व १२३ शाखांपैकी कुठेही व्यवहार करण्याची सेवा दिली जाते.
पैसे हस्तांतरण
तुमच्या खात्यातून पैसे पाठवा (रेमिटन्स), पैसे प्राप्त करा (बँकेच्या इतर ग्राहकांनी दिलेले चेक्स) आणि पैसे हस्तांतरित करा; हे सारे प्रत्यक्ष बँकेत न येता.
पासबुक प्रिंटिंग
कुठल्याही शाखेत पासबुक प्रिंट करा.
चेक डिपॉझिट
कुठल्याही बँकेचे चेक डिपॉझिट करा.
शिल्लक किती ते पाहा/अकाऊंट स्टेटमेंट मिळवा.
कुठल्याही शाखेतून आपल्या खात्यातील शिल्लक किती ते पाहा आणि स्टेटमेंट प्राप्त करा.
आरटीजीएस (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट)
या प्रणालीमुळे हस्तांतरित केलेले पैसे ताबडतोब योजलेल्या ठिकाणी प्राप्त होतात. भारतात बँकेच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचा अतिशय जलद आणि सुरक्षित मार्ग.
एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर)
आरटीजीएसमध्ये पैसे प्राप्त होताच मिळतात, तसे इथे न होता कार्यालयीन वेळात टप्प्याटप्प्याने ते प्राप्त होतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे पाठवण्याचा तो विश्वसनीय आणि सुरक्षित मार्ग आहे.